पेस्ट कंट्रोल व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा
एसआयआयएलसी
पेस्ट कंट्रोल व्यवसाय प्रशिक्षण
पुणे, ता. ४ : पेस्ट कंट्रोल व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा ६, ७ व ८ मार्चला आयोजिली आहे. यामध्ये पेस्ट मॅनेजमेंटची मूलभूत तत्त्वे, विविध कीटकांची ओळख, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, रसायनांचा सुरक्षित वापर, उपकरणांची माहिती तसेच शासन नियमांबाबत सखोल मार्गदर्शन मिळेल. यासह प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, व्यवसाय नोंदणी व परवाने, निविदा प्रक्रिया, किंमत ठरविणे, एएमसी करार तसेच डिजिटल मार्केटिंगद्वारे ग्राहक मिळविण्याचे कौशल्य आदींबाबतही माहिती दिली जाणार आहे. नवीन उद्योजक, टेक्निशियन, हॉस्पिटॅलिटी, सिक्युरिटी व लेबर कॉन्ट्रॅक्टर व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे.
ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने
ॲमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कोणती कागदपत्रे लागतात, किती दिवस लागतात हे सर्व करून बिझनेस कसा वाढवायचा, ॲमेझॉनवर विक्री करण्यास किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा ७ मार्चला आयोजिली आहे. कार्यशाळेत उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स असतील तर ते कसे हाताळावे, ॲमेझॉन ॲपवरती उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील; जेणेकरून विक्री वाढेल, सवलती कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, तत्काळ सपोर्ट कसा घ्यायचा याबाबत मार्गदर्शन होईल.
हायड्रोपोनिक्स भाजीपाला
व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला कार्यशाळा ७ व ८ मार्चला आयोजिली आहे. यात हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची ओळख, साधने व फर्टिगेशन, पाण्याची गुणवत्ता व अन्नद्रव्ये, देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती इत्यादी प्रकारचा भाजीपाला कसा पिकवावा, घरच्या घरी हायड्रोपोनिक युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, रोपे कशी तयार करावी, न्यूट्रियंट सोल्युशन कसे तयार करावे, सामू, प्रकाश, आर्द्रता, तापमानाचे महत्त्व, अन्नद्रव्यांची कमतरता व उपायांविषयी मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

