क्लाऊड किचन व्यवसायाद्वारे 
उत्पन्न वाढविण्याची संधी

क्लाऊड किचन व्यवसायाद्वारे उत्पन्न वाढविण्याची संधी

Published on

एसआयआयएलसी

क्लाऊड किचन कार्यशाळा

पुणे, ता. ५ : कमी गुंतवणुकीत स्वतःचा क्लाऊड किचन व्यवसाय कसा सुरू करायचा, याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १५ मार्चला आयोजिली आहे. क्लाऊड किचनमध्ये व्यावसायिक स्वयंपाकघरातील जागा वापरून फक्त डिलिव्हरी किंवा टेकअवेसाठी अन्न तयार केले जाते, ज्यामध्ये संपूर्ण रेस्टॉरंट सेटअपची आवश्यकता नसते. यामुळे हा खूप स्वस्त आणि सुरुवात करण्यास सोपा व्यवसाय आहे. कार्यशाळेत स्वतःचा क्लाऊड किचन ब्रँड कसा सुरू करावा, घरून मेस किंवा कॅन्टीन कसे चालवावे, कॅफे किंवा रेस्टॉरंट्सद्वारे स्वयंपाकघर कसे व्यवस्थापित करावे, स्वच्छता आणि सुरक्षितता कशी राखावी यासह सरकारी नियम, परवाने आणि नियम याबाबत मार्गदर्शन होणार आहे. ज्यांना हॉटेल, टिफिन सेवा किंवा मेस व्यवसाय उघडायचा आहे, परंतु मोठे बजेट नाही त्यांच्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

महारेरा परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (महारेरा)अंतर्गत रिअल इस्टेट एजंट परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, ती १ एप्रिल २०२६ पर्यंत खुली राहणार आहे. ज्या उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे त्यांनी तत्काळ परीक्षा अर्ज प्रक्रिया करावी, असे आवाहन केले आहे. यापूर्वी प्रशिक्षण पूर्ण करूनही मागील टप्प्यात परीक्षा अर्ज भरू न शकलेले उमेदवारही आता अर्ज करू शकतात. महारेरा परीक्षेसाठी २० तासांचे अधिकृत प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. जे सहभागी सध्या प्रशिक्षण घेत आहेत त्यांनी परीक्षा अर्ज प्रक्रिया बंद होण्यापूर्वी आपले प्रशिक्षण पूर्ण करावे, जेणेकरून त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या सुरुवातीस विलंब होणार नाही. प्रशिक्षण व परीक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार आहे. महारेरा अधिकृत प्रशिक्षणासंदर्भात माहिती मिळविण्यासाठी इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

‘लीव्ह अँड लायसन्स’ मास्टरक्लास
मालमत्ता भाड्याने देताना आजकाल बहुतांश नागरिक ‘रेंट’ किंवा ‘लीज’ कराराऐवजी ‘लीव्ह अँड लायसन्स’ पद्धत पसंत करीत आहेत. या प्रक्रियेतून मालकाचे हक्क सुरक्षित राहतात आणि भाडेकरूस तात्पुरते निवास किंवा व्यावसायिक वापराचे अधिकार मिळतात. मात्र योग्य करारनामा तयार करणे, कागदपत्रांची पूर्तता, स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्काची गणना, शासकीय पोर्टलवर फी भरणे, बायोमेट्रिक प्रक्रिया तसेच पोलिसांना कळविणे हे सर्व टप्पे तांत्रिक ज्ञानाशिवाय अवघड ठरू शकतात. याबाबत मार्गदर्शन करणारा मास्टरक्लास ९ मार्चला आयोजिला आहे. यामध्ये प्रत्यक्ष डेमोसह करार तयार करण्यापासून ग्राहकाला मंजूर प्रत सुपूर्द करण्यापर्यंतची प्रक्रिया शिकविली जाणार आहे. घरमालक, रिअल इस्टेट एजंट, वकील, बिल्डर तसेच अतिरिक्त उत्पन्न कमावू इच्छिणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२, ७३५०००१६०३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com