क्लाऊड किचन व्यवसायाद्वारे
उत्पन्न वाढविण्याची संधी

क्लाऊड किचन व्यवसायाद्वारे उत्पन्न वाढविण्याची संधी

Published on

पुणे, ता. ८ : कमी गुंतवणुकीत स्वतःचा क्लाऊड किचन व्यवसाय कसा सुरू करायचा, याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १५ मार्चला आयोजिली आहे. क्लाऊड किचनमध्ये व्यावसायिक स्वयंपाकघरातील जागा वापरून फक्त डिलिव्हरी किंवा टेकअवेसाठी अन्न तयार केले जाते, ज्यामध्ये संपूर्ण रेस्टॉरंट सेटअपची आवश्यकता नसते. यामुळे हा खूप स्वस्त आणि सुरुवात करण्यास सोपा व्यवसाय आहे. कार्यशाळेत स्वतःचा क्लाऊड किचन ब्रँड कसा सुरू करावा, घरून मेस किंवा कॅन्टीन कसे चालवावे, कॅफे किंवा रेस्टॉरंट्सद्वारे स्वयंपाकघर कसे व्यवस्थापित करावे, स्वच्छता आणि सुरक्षितता कशी राखावी, यासह सरकारी नियम, परवाने आणि नियम याबाबत मार्गदर्शन होणार आहे. ज्यांना हॉटेल, टिफिन सेवा किंवा मेस व्यवसाय उघडायचा आहे; परंतु मोठे बजेट नाही, त्यांच्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे.

औषधी वनस्पती लागवड
ऑनलाइन कार्यशाळा
आयुर्वेदिक व सेंद्रिय उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी जास्त असल्याने गेल्या काही वर्षात औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वनौषधींची लागवड पद्धतीविषयी मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २६ मार्चला आयोजिली आहे. यामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीचे महत्त्व आणि व्याप्ती, वनौषधी व सुगंधी वनस्पतींचे शेतजमिनीला होणारे फायदे, वनस्पती लागवडीचे तंत्र, नर्सरीचे तंत्र, व्यावसायिकदृष्ट्या लागवडीच्या पद्धती, औषधी वनस्पतींची प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, लागवड व प्रक्रिया उद्योगासाठीच्या सरकारी योजना, मार्केटिंगसाठी असणारा वाव आदींविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

शेवगा लागवड, उत्पादन व निर्यात संधी
स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात नियमित मागणी असणाऱ्या शेवग्याचा आयुर्वेद औषधींमध्येही वापर वाढला आहे. शेवगा पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन व निर्यात व्यवस्थापनाबाबत माहिती करून देणारी कार्यशाळा २९ मार्चला आयोजिली आहे. कार्यशाळेत निर्यातक्षम शेवगा उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, निकष, ट्रेसिबिलीटी, शेवगा निर्यातीसाठी गुणवत्तेची पडताळणी, परकीय बाजारपेठ, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायनमुक्त उत्पादन, कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम यासंदर्भात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com