

एसआयआयएलसी
स्वीय सहाय्यकांसाठी विशेष प्रशिक्षण
पुणे, ता. २८ ः लोकप्रतिनिधींचा स्वीय सहाय्यक म्हणून प्रभावीपणे काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण ४ व ५ एप्रिलला आयोजिले आहे. यात स्वीय सहाय्यकाचे महत्त्व, संधी व आव्हाने, कर्तव्ये व जबाबदाऱ्या, विधान मंडळाच्या कामकाजाची माहिती, मतदारसंघाचा अभ्यास व व्यवस्थापनावर मार्गदर्शन होणार आहे. याशिवाय सोशल मीडियाचा प्रभावी वापर, शासन व प्रशासनाशी संपर्क व समन्वय, शासकीय व अशासकीय योजनांची माहिती, वेळेचे नियोजन तसेच लोकप्रतिनिधींच्या अपेक्षांचा आढावा घेतला जाईल. हे प्रशिक्षण पदवीधर उमेदवार, एमपीएससी/यूपीएससी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, राजकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे तसेच सार्वजनिक प्रशासनात रस असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
अन्न सेवा उद्योगाविषयी कार्यशाळा
अन्न सेवा (फूड सर्व्हिस) उद्योगात व्यवसाय सुरू करू इच्छिणारे उद्योजक, हॉटेल व रेस्टॉरंट मालक तसेच नवउद्योजकांसाठी ५ एप्रिलला विशेष कार्यशाळा आयोजिली आहे. यात हॉटेल, कॅफे, क्लाऊड किचन आणि ढाबा व्यवसायाचे नियोजन, ब्रँडिंग, कर्मचारी व्यवस्थापन तसेच किचन व फ्लोअर ऑपरेशन्स, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, खर्चाचे नियोजन याविषयी मार्गदर्शन होणार आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंट व्यवसाय सुरू करताना २१ महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती, क्लाऊड किचनची संकल्पना, तसेच स्विगी व झोमॅटो यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मची कार्यपद्धती, कमिशन संरचना, फूड स्टॉल्स, ढाबा व कॅफेद्वारे स्थानिक पातळीवर प्रभावी व्यवसाय उभारण्याचे तंत्र, स्टाफिंग, किचन लेआउट, पीओएस प्रणाली, इन्व्हेंटरी व्यवस्थापन आणि वित्तीय नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
बांधकाम व्यवसाय व्यवस्थापन
स्थापत्य अभियांत्रिकीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली व्यक्तीही योग्य प्रशिक्षणानंतर बांधकाम उद्योगात आपला व्यवसाय सुरू करू शकते अथवा करिअर घडवू शकते. या पार्श्वभूमीवर ३० दिवसांचे प्रगत बांधकाम पर्यवेक्षक (कन्स्ट्रक्शन सुपरवायझर) प्रशिक्षण १३ एप्रिलपासून सुरू होत आहे. यामध्ये बांधकाम उद्योगात नोकरी मिळण्याची शक्यता वाढवणारे, स्थापत्य अभियांत्रिकीचे प्रगत ज्ञान देणारे, प्रात्यक्षिकावर आधारित प्रशिक्षण देणार आहे. बांधकाम क्षेत्र व साहित्याचा परिचय, रेखाचित्राचे वाचन व प्रत्यक्ष साईटवर त्याचा सराव, क्षेत्रभेटी, प्रकल्प पूर्वतयारी, कंत्राटदाराच्या कामाची पद्धत, अंदाज व खर्च नियोजन, बांधकाम उद्योगातील १४ महत्त्वाच्या पायऱ्या, सुरक्षिततेसाठी खबरदारी व वेळेचे व्यवस्थापन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.