डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण

डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण
Published on

एसआयआयएलसी

निर्जलीकरण व्यवसाय मार्गदर्शन

पुणे, ता. ३० : निर्जलीकरण व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट निर्जलीकरण उद्योग प्रकल्पात शनिवारी (ता. ४) आयोजिले आहे. यात निर्जलीकरण म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, प्रमुख घटक व पद्धती, घटक पदार्थ व त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, मशिनरी, फ्लो चार्ट, बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, प्रकल्पासाठी जागेची निवड, गुंतवणूक, प्रकल्प अहवाल इ.विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.

व्यावसायिक मसाले कार्यशाळा
घरगुती चवीचे झणझणीत कोल्हापूर स्टाइल मसाले प्रात्यक्षिकासह शिकविणारी कार्यशाळा ११ व १२ एप्रिलला आयोजिली आहे. यात १० प्रकारचे मसाले शिकविले जातील. त्याच्या नोट्स पुरवल्या जातील. पहिल्या दिवशी बिर्याणी, चिकन, मटन, चाट, किचन किंग, मालवणी कोकणी, काळा, कोल्हापुरी कांदा लसूण, मिसळ, गोडा, पेरी पेरी, गरम इत्यादी मसाले प्रात्यक्षिकासह शिकवले जातील. दुसऱ्यादिवशी मसाला व्यवसायासाठी भांडवल, कच्च्या मालाची खरेदी व उपलब्धता, मागणी व स्वरूप, बाजारपेठ, मार्केटिंगच्या पद्धती, जागा, प्रकल्प अहवाल, मशिनरी, कॉस्टिंग आदींविषयी माहिती दिली जाईल.

जुन्या इमारतींचा पुनर्विकास
यूडीसीपीआर नियमामुळे महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रीडेव्हलपमेंट) सुरू आहे किंवा होणार आहे. हा नियम काय आहे? त्यामुळे एफएसआय कसा व किती वाढला? त्याचा वापर कसा करायचा? फिसिबिलीटी अहवाल कशासाठी काढतात? पीएमसी म्हणजे काय? आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा १२ एप्रिलला आयोजिली आहे. यामध्ये इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, त्यासाठीचे पेपर्स, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा रजिस्ट्रेशन आदींबाबत सखोल मार्गदर्शन होणार आहे.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com