सकाळ कनेक्ट

सकाळ कनेक्ट
Published on

एसआयआयएलसी

प्रॉडक्ट फोटोग्राफी अन् व्हिडिओग्राफी
पुणे, ता. १ : प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी एक विशेष प्रकार आहे. सध्या कॅमेऱ्यातूनही प्रॉडक्टचे वेगळेपण फोटो आणि व्हिडिओद्वारे उठावदार पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचते. याबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण ५ एप्रिलला होणार आहे. यामध्ये प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीचे प्रात्यक्षिक आणि तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन होईल. नवीन लोकांसाठी व इतर कोणत्याही व्यावसायिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी, व्यवसायाला प्रोफेशनल लूक देण्यासाठी, ब्रँड अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, स्पर्धेत टिकण्यासाठी प्रशिक्षण उपयुक्त आहे.

जुन्या इमारतींचा पुनर्विकास
‘यूडीसीपीआर’ नियमामुळे राज्यात मोठ्या शहरांमध्ये जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रीडेव्हलपमेंट) सुरू आहे किंवा होणार आहे. हा नियम काय, त्यामुळे एफएसआय कसा व किती वाढला, त्याचा वापर कसा करायचा, फिसिबिलीटी रिपोर्ट कशासाठी काढतात, पी.एम.सी. म्हणजे काय, आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा १२ एप्रिलला होणार आहे. यामध्ये इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, त्यासाठीचे पेपर, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा रजिस्ट्रेशन आदी सर्व मुद्यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. सोसायटी स्वयंपुनर्विकास करू इच्छिणारे, नवीन विकसक, ज्यांना रीडेव्हलपमेंट क्षेत्रात रस आहे, असे सर्वजण, रिअल इस्टेट एजंट यांच्यासाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.

बांधकाम व्यवसाय व्यवस्थापन
स्थापत्य अभियांत्रिकीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली व्यक्तीही योग्य प्रशिक्षणानंतर बांधकाम उद्योगात व्यवसाय सुरू करू शकते अथवा करिअर घडवू शकते. या पार्श्वभूमीवर ३० दिवसांचे प्रगत बांधकाम पर्यवेक्षक (कन्स्ट्रक्शन सुपरवायझर) प्रशिक्षण १३ एप्रिलपासून सुरू होत आहे. यामध्ये बांधकाम उद्योगात नोकरी मिळण्याची शक्यता वाढवणारे, स्थापत्य अभियांत्रिकीचे प्रगत ज्ञान देणारे, प्रात्यक्षिकावर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्राचा परिचय, बांधकाम साहित्याचा परिचय, रेखाचित्राचे वाचन व प्रत्यक्ष साइटवर त्याचा सराव, क्षेत्रभेटी, प्रकल्प पूर्वतयारी, कंत्राटदाराच्या कामाची पद्धत, अंदाज व खर्च नियोजन, बांधकाम उद्योगातील १४ महत्त्वाच्या पायऱ्या, सुरक्षिततेसाठी घ्यायची खबरदारी व वेळेचे व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com