केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात
केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

sakal_logo
By

रसायनी, ता. २२ (बातमीदार) : रसायनीतील तळवली येथील बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व माजगाव केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रस्तरिय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. शुक्रवारी रायगड जिल्हा परिषद, इसांबे, येथील प्राथमिक शाळेच्या मैदानावर दहा शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पहिली ते चौथी लहान आणि पाचवी ते सातवी मोठा अशा दोन गटात स्पर्धा पार पडल्‍या. सांघिक खेळात कबड्डी, लंगडी आणि वैयक्तिक खेळात धावणे, लांब उडी, बेडूक उड्या, पोता उडी, लिंबू चमचा, दोरी उड्या इत्यादी खेळांचा समावेश होता. दोन वर्षे कोरोना संसर्गनंतर स्पर्धांचे आयोजन केल्‍याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धा आयोजनाचा खर्च विष्णू देवघरे यांनी केला.
रसायनी ः