रसायनीत मराठी भाषा दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रसायनीत मराठी भाषा दिन साजरा
रसायनीत मराठी भाषा दिन साजरा

रसायनीत मराठी भाषा दिन साजरा

sakal_logo
By

रसायनी (बातमीदार) : रसायनीतील महिला उद्योग मंडळ संचालित शिशू विकास आणि प्राथमिक शाळा, पराडे कवीश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने आणि मराठी भाषा गौरव दिन सोमवारी (ता. २७) नाळ मराठी मातीशी हा साहित्यिक कार्यक्रम अतिशय उत्साहात झाला. मंडळाच्या खजिनदार सुनीता कराड यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी मुख्याध्यापक महादेव पाटील, ललिता गुडसे, सुजाता पाटील, अश्विनी शेळके उपस्थित होते. तर मुख्याध्यापक महादेव पाटील यांनी कुसुमाग्रजांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी कविता, शिवगर्जना, उदयभानाचा वध आदी पोवाडे गायन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल गोंधळी यांनी केले.