श्री सदस्यांकडून डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्‍या वाढदिवस साजरा

श्री सदस्यांकडून डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्‍या वाढदिवस साजरा

Published on

श्री सदस्यांकडून डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा वाढदिवस साजरा
रेवदंडा, ता. १४ (बातमीदार) : ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा वाढदिवस रेवदंड्यामधील मारुती आळीतील निवासस्थानी साधेपणाने साजरा करण्यात आला. येथील पारनाक्यावर भव्य होर्डिंग्ज लावण्यात आले होते. त्यासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. सकाळपासूनच दासभक्तांनी त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. या वेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली; तर अनेकांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परिसर सद्‍गुरूमय झाला होता. यापुढे समाजाला दिशा देण्याचे अविरत कार्य निरूपणाच्या माध्यमातून चालूच राहणार असल्याचा संदेश अप्पासाहेब यांनी शुभेच्छा स्वीकारताना उपस्थितांना दिला. सकाळपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून श्री सदस्य रेवदंड्यामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com