रेवस -रेड्डी महामार्ग कोकणचा विकास करणार

रेवस -रेड्डी महामार्ग कोकणचा विकास करणार
Published on

रेवस-रेड्डी महामार्ग कोकणचा विकास करणार!

रेवदंडा, ता. ११ (बातमीदार) : ‘रेवस ते रेड्डी महामार्ग होत असल्याने कोकणातील अनेक खाड्यांवर पूल उभे राहणार असल्याने दळणवळणाची सुविधा वाढणार आहे. त्यामुळे कोकणचा विकास होईल. या महामार्गाने संपूर्ण कोकणातील पर्यटन व्यवसाय वाढेल आणि रोजगाराचे नवीन दालन खुले होईल,’ असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.
एमएमआरडीएअंतर्गत अलिबाग तालुक्यातील चौल व रेवदंडा जिल्हा परिषद गणातील १७० कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ आज (ता. ११) रेवदंडा पारनाका येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अलिबाग तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, १७० कोटी रुपयांच्या कामात रस्ते, समाजमंदिर, मच्छीमार्केट आदी विकासकामे होणार असली तरी या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. ती दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. दरम्यान, या कार्यक्रमाअगोदर उपमुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत स्थानिक आमदार महेंद्र दळवी आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com