सलग सुट्यामुळे बँकेतील आर्थिक व्‍यवहारावर ताण

सलग सुट्यामुळे बँकेतील आर्थिक व्‍यवहारावर ताण

Published on

सलग सुट्यांमुळे बँकेतील आर्थिक व्‍यवहारावर ताण
रेवदंडा, ता. १५(बातमीदार) : मागील आर्थिक वर्ष संपताना आणि आणि नवीन वर्ष सुरू झाल्यांनतर पहिल्या पंधरवड्यात भरपूर सुट्ट्या आल्याने आज ( ता. १५) रोजी अनेक बँका, डाकघर, पतसंस्था या ठिकाणी ग्राहकांची आर्थिक व्यवहार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. यामुळे वयोवृद्धांना सर्वाधिक त्रास जाणवला, तर बँकेतील आर्थिक व्‍यवहारावरदेखील ताण दिसून आला.
१० एप्रिलला महावीर जयंतीची सार्वजनिक सुट्टी नंतर शुक्रवारी एक दिवस व्यवहार सुरू होते, तर दुसरा शनिवार व रविवारची सुट्टी तसेच सोमवारी आंबेडकर जयंतीची सार्वजनिक सुट्टी आल्याने सलग तीन दिवस बॅंका बंद होत्या. त्‍यामुळे विविध आर्थिक व्यवहार खोळंबले होते. ग्रामीण भागात तर सुट्टया पैशांची चांगलीच चणचण जाणवली. ऑनलाइन व्यवहारामुळे नागरिकांना काहीसा लाभ मिळाला. त्‍यामुळे मंगळवारी बँकाचे व्‍यवहार सुरू झाल्याने अनेक ठिकाणी गर्दी दिसून येत होती. अनेक बॅंकेत सेवानिवृत्तधारक निवृत्तिवेतन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आले होते, मात्र काहींचे एप्रिल, मार्चचे निवृत्ती वेतन अद्याप आले नसल्याने त्‍यांची अडचण झाली, तर काही शेतकरीवर्गाने नवीन पीक कर्ज योजनेसाठी बँकेत गर्दी केली होती. दरम्यान, पुन्हा शुक्रवारी गुडफ्रायडेला सार्वजनिक सुट्टी असल्याने आर्थिक व्यवहारावर परिणाम जाणवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com