रेवदंडा परिसरात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा;
रेवदंडा परिसरात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा
निसर्गरम्य चौल-रेवदंडा भागात उष्णतेची वाढती चाहूल
रेवदंडा, ता. १५ (बातमीदार) : काही दिवसांपूर्वीच मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित केले असताना आता रेवदंडा परिसरात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा जाणवू लागला आहे. सकाळी अकरा ते संध्याकाळी चार या काळात तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांना प्रखर उष्णतेचा अनुभव येत आहे. अलिबाग तालुक्यातील चौल-रेवदंडा ही दोन्ही ठिकाणे त्यांच्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असली तरी या वर्षी वातावरणातील बदल स्पष्टपणे जाणवत आहेत.
मागील काही वर्षांत या भागात सलगपणे आलेल्या तौक्ते आणि इतर चक्रीवादळांमुळे येथील हिरवाई मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. नारळ, सुपारी, जायफळ, फणस, पपई, आंबा यांसारख्या बागायती झाडांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून, काही ठिकाणी संपूर्ण बागाच उद्ध्वस्त झाल्या. या आपत्तीमुळे रेवदंडा आणि चौल परिसरातील नैसर्गिक वातावरणाचे संतुलन ढासळले आहे. याशिवाय अनेक ठिकाणी बागायतीची जागा आता सिमेंट काँक्रीटच्या इमारतींनी व्यापल्याने उष्णता अधिक वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पूर्वी येथील दाट हिरवाई व समुद्रकिनारी असलेले वारे यामुळे ‘ऑक्टोबर हीट’ची तीव्रता फारशी जाणवत नसे. परंतु सध्या मात्र वातावरणात आर्द्रता कमी व उष्णतेची तीव्रता वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सर्वामुळे चौल-रेवदंडासारख्या पर्यटनस्थळांतील निसर्गरम्यता कमी होत चालली असून, स्थानिकांनी पर्यावरण संतुलनासाठी झाडे लावण्याचा व हिरवाई टिकवून ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.