रेवदंड्यात नाताळनंतर पर्यटनाची ओहोटी

रेवदंड्यात नाताळनंतर पर्यटनाची ओहोटी

Published on

रेवदंड्यात नाताळनंतर पर्यटनास ओहोटी
चार दिवसांची उत्साही गर्दी ओसरली; व्यावसायिक पुन्हा पर्यटकांच्या प्रतीक्षेत
रेवदंडा, ता. ४ (बातमीदार) : रेवदंड्यात नाताळ व नववर्षाच्या स्‍वागतानंतर पर्यटकांची ओहोटी लागली आहे. मोठ्या संख्येने आलेले पर्यटक आणि चाकरमानी गावातून परतू लागल्याने रेवदंड्यातील उत्साह काहीसा मावळला.
नाताळपासून सलग चार दिवस गावात चैतन्यपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले. अनेक महिने बंद असलेली घरे उघडली गेली होती, तर गावातील रस्ते, बाजारपेठ आणि समुद्रकिनारा गजबजून गेला होता. सकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी होणारी गर्दी आणि संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक बाजारपेठेला मोठी चालना मिळाली होती. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि ख्रिसमसचा आनंद लुटण्यासाठी मागील आठवड्यात रेवदंडा परिसरात पर्यटकांसह चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र रविवारी या गर्दीला ओहोटी लागल्याचे चित्र दिसून आले. सध्या कॉटेज, रिसॉर्ट तसेच लॉजिंग व्यवसायांकडील वर्दळ थांबलेली असून, बाजारपेठेतील खाद्यपदार्थांचे स्टॉल, उपाहारगृहे, थंडपेयांची दुकाने इत्यादी पुन्हा पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत. पर्यटकांच्या उपस्थितीत स्थानिक कृषी उत्पादनांना चांगली मागणी मिळाली होती. त्यामुळे शेतकरी आणि स्थानिक विक्रेत्यांना काही दिवसांचा का होईना दिलासा मिळाला. तसेच खासगी वाहतुकीला चांगले दिवस आले होते. एसटी बसमध्ये प्रवाशांची संख्या वाढल्याने उत्पन्नातही वाढ झाल्याचे चित्र होते. आता महिन्याच्या अखेरीस सलग तीन दिवसांची सुट्टी असल्याने पुन्हा एकदा पर्यटनाची झुळूक येईल, या आशेवर रेवदंड्यातील व्यावसायिक आणि सेवा पुरवठादार नजर लावून बसले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com