होळी उत्सवासाठी चाकरमान्यांची गावाकडे धाव

होळी उत्सवासाठी चाकरमान्यांची गावाकडे धाव

Published on

होळी उत्सवासाठी चाकरमान्यांची गावाकडे धाव
सलग सुट्ट्यांचा फायदा; नैसर्गिक रंग वापरण्याचे आवाहन
पुरणपोळी साहित्य व पिचकऱ्यांची विक्री वाढली
रेवदंडा, ता. २६ (बातमीदार) : शिमगा आणि होळी उत्सवासाठी चाकरमानी मंडळींची गावाकडे ये-जा सुरू झाली असून बाजारपेठेत सणाची लगबग वाढली आहे. यंदा सोमवारी होळी, मंगळवारी धुलिवंदन आणि त्याआधी चौथा शनिवार आल्याने अनेकांनी सुट्ट्यांचे नियोजन करून सलग चार दिवस सणाचा आनंद लुटण्याची तयारी केली आहे. छोट्या होळ्यांना सुरुवात झाली असून पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी वृक्षतोड टाळा व नैसर्गिक रंगांचा वापर करा, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.
बाजारात पुरणपोळीच्या साहित्याची दुकाने सजली असून महागाईमुळे काही ठिकाणी तयार पोळ्यांकडे महिलांचा कल वाढताना दिसतो. रंग, पिचकऱ्या व विविध सणसाहित्याची खरेदी सुरू झाली आहे. रंगांच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती विक्रेते तौफिक मणियार यांनी दिली. पोपटीसाठी वालाच्या शेंगा व स्थानिक कळिंगडेही बाजारात दाखल झाले असून होळीच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com