मराठी शाळेत अवतरली खाद्यजत्रा
मराठी शाळेत अवतरली खाद्यजत्रा
रेवदंडा, ता. १२ (बातमीदार) : येथील मारुती आळीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत (ता.११) रोजी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व पौष्टीक आहाराची जागरुकता निर्माण करण्यासाठी व त्यांना स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी खाद्यजत्रेचे शाळेच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते.
सदर खाद्य जत्रेचा व स्वादाचा उत्सवाचे उदघाटन सरपंच प्रफुल्ल मोरे,अलिबाग पंचायत समिती सदस्य शरद गोंधळी, चौल केंद्र शाळेचे केंद्र प्रमुख राजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दुशांत झावरे, शाळा समिती व्यवस्थापन अध्यक्ष व सदस्य, प्रतिष्ठीत नागरिक, पालक, शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खाद्यपदार्थ स्टाॅल मध्ये भेळ, पोहे, वडापाव, सॅलड, विविध सरबते आदि वस्तू विक्रीला ठेवण्यात आल्या होत्या. या जत्रेतून विद्यार्थी वर्गाला स्वच्छता,नियोजन,संवाद कौशल्य या गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक उल्हास राणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, सहशिक्षिका शुभांगी राणे यांनी या खाद्य जत्रेचा उद्देश बाबत प्रास्ताविक केले तर पदवीधर शिक्षक अजय गुंड यांनी आभार प्रदर्शन केले. जत्रेने शाळेचा परिसर गर्दीने फुलून गेला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

