पर्यटन वाढीसाठी व्यवसायिकाचा अनोखा संकल्प.
पर्यटनवाढीसाठी व्यावसायिकाचा अनोखा संकल्प
रेवदंडा, ता. १९ (बातमीदार) : मराठी नववर्षाचे स्वागत ठिकठिकाणी संगीत मैफली, शोभायात्रा आणि गुढी उभारून जल्लोषात केले जात आहे. अशात, रेवदंडा येथील व्यावसायिक अमित म्हात्रे यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी एक आगळा-वेगळा संकल्प केला आहे. चौल-रेवदंडा समुद्रकिनाऱ्याचा विकास व्हावा आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी त्यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सह्यांची व हातांच्या ठशांची मोहीम राबवली.
रेवदंडा समुद्रकिनाऱ्याच्या विकासासाठी नागरिकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अमित म्हात्रे यांनी एका कापडावर नागरिकांच्या हातांचे ठसे आणि सह्या घेतल्या. हे स्वाक्षरी केलेले निवेदन लवकरच विविध सरकारी खात्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित मंत्र्यांना देण्यात येणार असल्याचे अमित म्हात्रे यांनी सांगितले. अलिबाग तालुक्यातील चौल-रेवदंडा या जोड गावांना निसर्गाचा वरदहस्त लाभला असून, येथील किनाऱ्यावर किमान प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांचा ओघ वाढेल आणि त्यातून गावातील तरुणांना रोजगार मिळेल, हा मुख्य हेतू या उपक्रमामागे आहे.
दरम्यान, चौल-रेवदंडा परिसरात सकाळपासून घराच्या दर्शनी भागात वाडया-वस्त्यावर रंगीबेरंगी वस्त्रांच्या गुढ्या उभारत आल्या, तर नववर्षानिमित्त विद्युत उपकरणे, कपडे, मोबाईल शाॅपी, फर्निचर आदी दुकानात खरेदीचा उत्साह दिसून आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

