परिसर भेटीतून विद्यार्थ्यांनी घेतला पर्यावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.

परिसर भेटीतून विद्यार्थ्यांनी घेतला पर्यावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.

Published on

रेवदंडा शाळेची उमटे धरण परिसरात सहल
परिसर भेटीतून विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष अनुभव
रेवदंडा, ता. २१ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथील विद्यार्थ्यांनी नुकतीच उमटे धरण परिसरात शैक्षणिक सहल काढली. या उपक्रमाद्वारे ३० विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून पर्यावरणाचे महत्त्व समजून घेतले.
धरणक्षेत्रात मुख्याध्यापक उल्हास राणे, सहशिक्षिका शुभांगी राणे, पदवीधर शिक्षक अजय गुंड यांनी विद्यार्थी वर्गाला पाणी संवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण याबाबत सखोल माहिती दिली. परिसरातील विविध झाडे, वनस्पती त्यांचे प्रकार व काही वनस्पतींचा उपयोग याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात आनंद घेत असताना पर्यावरण जपण्याची जबाबदारी समजून घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थी वर्गात शैक्षणिक व सर्वांगिण विकास साधला गेला, असे शिक्षकांनी म्हंटले आहे.

रेवदंडा-बातमीदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com