

बसस्थानकात पथनाट्यातून योजनांची जनजागृती
प्रवाशांना शासनाच्या विविध योजना एका मंचावर समजावल्या
रेवदंडा, ता. ३० (बातमीदार) : येथील बसस्थानकात रविवारी (ता. २९) दुपारी पथनाट्याच्या माध्यमातून शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती प्रवाशांना देण्यात आली. दिशा बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या पथकाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने हे सादरीकरण केले.
या पथनाट्यात मध्यमवर्गीयांसाठी घरकुल योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षण शिष्यवृत्ती, किसान सौर पंप योजना, महिला सन्मान योजना, मत्स्य व उद्योजकता योजना यांची प्रभावी मांडणी करण्यात आली. “शासनाच्या योजना एकाच छताखाली” हा संदेश देत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
अभिजीत पाटील, दिपक पाटील, हाफिस खान, नाना कोळी आदी कलाकारांनी सादरीकरण केले. बसस्थानकात सुमारे ४० प्रवासी उपस्थित होते. चौल नाका व पारनाका येथेही पथनाट्य सादर करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.