मोटारसायकलला पिक अपची धडक, गुन्हा दाखल.

मोटारसायकलला पिक अपची धडक, गुन्हा दाखल.
Published on

दुचाकीला टेम्पोची धडक
रेवदंडा, ता. १५ (बातमीदार) ः येथील पालव फाट्यावरील वळणावर भरधाव पिकअप टेम्पोने दुचाकीला धडक दिली. मंगळवारी (ता. १४) हा अपघात घडला असून, यामध्ये दोन तरुण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी पिकअप चालक किशोर पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सर्वेश पाटील (वय २७) आणि स्वप्नील कवळे (वय ३४) हे दोघे दुचाकीवरून अलिबागकडून बागमळा येथे पेट्रोल भरण्यासाठी येत होते. पालव फाट्याजवळील वळणावर आले असता, रेवदंडा बाजूकडून येणाऱ्या एका पिकअप टेम्पो विरुद्ध दिशेने आल्याने दुचाकीला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, पिकअप रस्त्यावरच पलटी झाला. यामध्ये सर्वेश आणि स्वप्नील गंभीर जखमी झाले, तर चालक किशोर यांनाही दुखापत झाली आहे. या तिघांना तातडीने रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com