

१० तोळे सोन्याच्या मंगळसूत्राची चोरी
रेवदंडा, ता. ४ (बातमीदार) ः अलिबाग तालुक्यातील आंबेपूर येथे घरामध्ये ठेवलेले १० तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात सुहासिनी लोगडे (वय ४१) यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेपुरमधील सुहासिनी लोगडे यांनी १४ एप्रिल ते १६ एप्रिल यादरम्यान घरातील किचनरूममधील फ्रीजवर काढून ठेवलेले मंगळसूत्र चोरीला गेले आहे. सुहासिनी यांनी गावातीलच ४२ वर्षीय महिलेने मंगळसूत्र चोरल्याचा संशय व्यक्त केला असून, त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मंगळसूत्राची किंमत ६० हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिस कर्मचारी मनीष ठाकूर पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.