कोकणात दिवाळीची परंपरा

कोकणात दिवाळीची परंपरा
Published on: 

कोकणात दिवाळीची परंपरा
कृषी संस्कृतीचा वारसा जपत सण साजरा; नव्या बदलांची फराळावर छाप
रेवदंडा, ता. ८ (बातमीदार) : कोकणातील दिवाळी सणाला कृषी संस्कृती आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेची परंपरा लाभली आहे. नरक चतुर्दशीपासून सुरू होणारा हा उत्सव तुळशीविवाहापर्यंत सुरू राहतो. अभ्यंगस्नान, ग्रामदैवताचे दर्शन आणि नव्या भातापासून तयार केलेल्या फराळातून कोकणातील पारंपरिक जीवनशैलीचे दर्शन घडते.
नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवसापासून आकाशकंदील आणि पणत्यांनी घरांची सजावट केली जाते. पहाटे उटण्याने अभ्यंगस्नान करून कंराटीचे फळ पायाखाली चिरडण्याची प्रथा आहे. वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्याचा त्यामागील संकेत आहे. त्यानंतर तुळशीला वंदन केले जाते. नवीन भातापासून तयार केलेले पोहे, गूळ किंवा साखर, ओले खोबरे आणि करंजी असा पारंपरिक फराळ केला जातो. मात्र, आता तयार चिवड्याने पोह्यांची जागा घेतली आहे.

शेतीच्या स्थितीची उत्सवावर छाया
दिवाळीच्या दिवशी फराळापूर्वी ग्रामदैवताचे दर्शन घेण्याची प्रथा आजही अनेक गावांत कायम आहे. यंदा कमी पर्जन्यमानामुळे भाताचे उत्पादन अपेक्षेप्रमाणे न झाल्याने उत्सवावर त्याचा परिणाम जाणवत आहे. तरीही नव्या पिढीकडून परंपरा जपण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.