

शाळा सुरू होताच वाहतूक कोंडीत वाढ
गतिरोधक, वेगमर्यादा फलकांची मागणी
रेवदंडा, ता. १७ (बातमीदार) : हिवाळी सुट्टी संपल्यानंतर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे दुसरे सत्र सोमवारी (ता. १७) सुरू झाले. शाळा सुरू होताच रस्त्यांवर पालकांची आणि स्कूल बस, व्हॅनची वर्दळ वाढली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीच्या एसटी बसफेऱ्याही पूर्ववत सुरू झाल्याने रेवदंडा बाजारपेठेत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यातच अपघातप्रवण वळणांवर गतिरोधक नसल्याने विद्यार्थी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पारनाका, गोळा स्टॉप, केळकर नाका तसेच शैक्षणिक संकुलासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. मागील १० दिवसांत पारनाका परिसरातील वळणांवर मोटारसायकल आणि चारचाकी वाहनांच्या समोरासमोर धडक होण्याच्या घटना घडल्या असून, काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.
सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा या वेळेत एसटी बसची ये-जा सुरू असते. याच वेळी शाळा सुटणे आणि भरण्याच्या वेळा असल्याने रस्त्यांवर विद्यार्थ्यांसह पादचाऱ्यांची गर्दी होते. वळणांवरून वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर पांढरे पट्टे मारावेत, गतिरोधक बसवावेत आणि वेगमर्यादेचे फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.