समृध्दीवर प्रवाशांना मारहाण करुन लुट

समृध्दीवर प्रवाशांना मारहाण करुन लुट

Published on

समृद्धीवर प्रवाशांना मारहाण करून लूट

सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. ३ : समृद्धी महामार्गावर कोनांबे शिवारात सोमवारी (ता. २) पहाटे ३ वाजता प्रवाशांची लूट करण्यात आली. कारच्या काचा फोडून चाकू, चॉपरसारख्या हत्यारांचा धाक दाखवून ही लूट झाली. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
उल्हासनगर येथील दीपा रमेश वाधवा (वय २७), अंजू दाणी, सिया दाणी यांच्यासह व एक व्यक्ती छत्रपती संभाजीनगर येथे जात होते. कोनांबे शिवारातील घाटाजवळ कार थांबविण्यात आली. या वेळी रस्त्यालगतच्या पुलाजवळील डोंगरावरून तीन ते चार संशयित समृद्धी महामार्गावर आले. तोंडाला रुमाल बांधलेल्या या संशयितांनी लाठ्या, काठ्यांनी कारच्या काचा फोडल्या. चाकू व चॉपरचा धाक दाखवून दीपा वाधवा यांच्याकडील २० हजार हजार रुपये रोख, सोन्याची अंगठी, कानातील टॉप, नथ, चांदीची अंगठी काढून घेतली. अंजू दाणी यांच्या अंगावरील साडेतीन ग्रॅमची अंगठी, दोन ग्रॅमचे कानातील टॉप, अर्धा ग्रॅमची नथ, चांदीची अंगठी, पैंजण तसेच सिया दाणी यांच्याकडील कानातील टॉप, नथ काढून घेतली. बॅगांचीही झडती घेतली. घटनेनंतर त्यांनी पोलिस ठाण्यामध्ये येत लुटीबाबत पोलिसांना माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com