बेकायदा आठवडी बाजारावर महापालिकेची कारवाई

बेकायदा आठवडी बाजारावर महापालिकेची कारवाई
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील अनधिकृत आठवडा बाजारांविरोधात प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. लोढा हेवन, निळजे येथील ग्रीन पार्क टॉवरच्या मागील बाजूस दर शुक्रवारी भरविण्यात येणाऱ्या आठवडा बाजारावर शुक्रवारी महापालिकेच्या पथकाने कारवाई करून बाजार बंद केला. या कारवाईला विरोध करताना महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी संबंधित आयोजक आणि जागामालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आठवडा बाजार बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांच्या अधिपत्याखाली मुख्यालयातील फेरीवाला नियंत्रण पथक आणि ई प्रभागातील फेरीवाला पथकाच्या संयुक्तपणे कारवाईदरम्यान, बाजारातील फेरीवाले तसेच जागामालक राजा पाटील यांच्याकडून महापालिका पथकाला विरोध करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. काही व्यक्तींनी अधिकाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा आणत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. तसेच महापालिकेच्या वाहनास अडथळा निर्माण करण्याचा आणि वाहन अंगावर घालण्याचा प्रयत्न झाल्याने घटनास्थळी तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने बाजार बंद करण्यात आला.

अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागांची बैठक घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com