

कल्याण-शिळफाटा मार्गावर कोसळला मेट्रोच्या बांधकामाचा भाग
डोंबिवली, ता. ८ : कल्याण-शिळफाटा मार्गावरील सोनारपाडा बसथांब्याजवळ मेट्रो-१२च्या कामासाठी उभारण्यात आलेल्या बांधकाम गॅलरीचा काही भाग मंगळवारी (ता. ८) दुपारी अचानक कोसळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या प्रकारामुळे मेट्रोच्या सुरू असलेल्या कामाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कल्याण-शिळफाटा मार्गावर सोनारपाडा गावाच्या बसथांब्याजवळ मेट्रो-१२चे काम वेगाने सुरू आहे. मेट्रोचे पिलर उभारल्यानंतर त्यावरील पुढील बांधकाम सुरू असून, त्यासाठी कामगारांकडून बांधकाम गॅलरीचा वापर केला जातो. मंगळवारी दुपारी अचानक मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष कामाच्या ठिकाणी गेले. त्या वेळी गॅलरीचा काही भाग खाली कोसळल्याचे दिसून आले.
घटनेच्या वेळी गॅलरीमध्ये कामगार उपस्थित नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. तसेच, दुपारची वेळ असल्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ तुलनेने कमी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गॅलरी कोसळतानाचा व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केला असून, तो समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. गॅलरी नेमक्या कोणत्या कारणामुळे कोसळली, याबाबत एमएमआरडीएकडून मंगळवारी सायंकाळपर्यंत अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. घटनेची चौकशी होणार का आणि संबंधितांवर कारवाई केली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.