

डोंबिवली, ता. १६ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक खाद्यसंस्कृतीला आरोग्यदायी आहाराची जोड देण्यासाठी कल्याणमध्ये मोदक महोत्सव आणि स्वादिष्ट व पौष्टिक खाद्यपदार्थ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुभेदारवाडा कट्टा, कल्याण विकास फाउंडेशन, उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (ता. २०) सायंकाळी ४ ते ६ या वेळेत लाल चौकी येथील शारदा विद्या मंदिर शाळेत हा महोत्सव होणार आहे. या उपक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
महोत्सवात दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे. पहिल्या गटात मोदक स्पर्धा होणार असून, उकडीचे, तळलेले किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे मोदक स्पर्धेसाठी सादर करता येतील. या स्पर्धेसाठी वयोमर्यादा नसून महिला आणि पुरुष अशा सर्वांसाठी सहभाग खुला आहे. दुसऱ्या गटात स्वादिष्ट व पौष्टिक खाद्यपदार्थ स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत पालक आणि विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे सहभागी होणे अपेक्षित आहे. पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून, कोणताही स्वादिष्ट तसेच पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करून सादर करता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.