आश्वासित प्रगती योजनेची थकबाकी मिळणार

आश्वासित प्रगती योजनेची थकबाकी मिळणार
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाच्या काळात आर्थिक दिलासा मिळाला आहे. १०, २० आणि ३० वर्षांच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यातील फरकाची थकबाकी देण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने बुधवारी (ता. १६) काढला. या निर्णयाचा सुमारे तीन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू झाल्यानंतरही फरकाची थकबाकी अनेक कर्मचाऱ्यांना मिळालेली नव्हती. ही रक्कम मिळावी, यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. पत्रव्यवहार तसेच प्रशासनासोबत झालेल्या चर्चांमधून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली होती. संघटनेचे अध्यक्ष बाळ हरदास यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी सचिन बासरे, सुरेश तेलवणे, अजय पवार, सुनील पवार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी या मागणीसाठी पाठपुरावा केला. या निर्णयामुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या थकबाकीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या काळात हा निर्णय झाल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

वारसा हक्क, अनुकंपा प्रकरणांसाठीही पाठपुरावा
महापालिका कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्क आणि अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांची काही प्रकरणे अद्याप प्रलंबित असल्याचे संघटनेने म्हटले आहे. संबंधित प्रकरणांमध्ये लवकर निर्णय घेऊन कुटुंबांना दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार आहे. वारसा हक्क आणि अनुकंपा तत्त्वावरील प्रकरणांमध्येही सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी युनियन प्रयत्नशील राहणार असल्याचे सचिन बासरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com