

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ : श्री मलंगगडावर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भक्ती, शक्ती आणि अध्यात्माचा जागर पाहायला मिळाला. पौर्णिमेनिमित्त आयोजित वारकरी दिंडी, रिंगण सोहळा आणि कीर्तनात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘राम कृष्ण हरी’चा गजर आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने मलंगगड परिसर भक्तिमय झाला होता.
कल्याणजवळील श्री मलंगगडावर प्रत्येक पौर्णिमेला भाविकांची मोठी गर्दी होते. त्यानुसार रविवारी (ता. २५) कोजागिरी पौर्णिमेनिमित्त वारकरी दिंड्या गडावर दाखल झाल्या होत्या. वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्यात सहभागी होत नामस्मरण केले. यावेळी डोंबिवलीकर विनीत महाराज म्हात्रे यांच्या कीर्तनाचे आयोजन गणपती मंदिरात करण्यात आले होते. कीर्तनातून भक्ती आणि अध्यात्माचा संदेश देण्यात आला. या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि भाविकांची गर्दी व्यवस्थित नियंत्रित राहावी, यासाठी हिललाइन पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भक्तिमय वातावरणात कोजागिरी पौर्णिमा उत्सव उत्साहात पार पडला.
श्री मलंगगडावरील धार्मिक परंपरा जपण्यासाठी स्थानिकांकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या परंपरांचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या पौर्णिमा सोहळ्यात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील वारकरी, भाविक तसेच विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांसह अन्य संघटनांचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.