रावे शाळेला डिजिटल स्क्रीन सुपूर्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रावे शाळेला डिजिटल स्क्रीन सुपूर्द
रावे शाळेला डिजिटल स्क्रीन सुपूर्द

रावे शाळेला डिजिटल स्क्रीन सुपूर्द

sakal_logo
By

वडखळ (बातमीदार) : ई-लर्निंगद्वारा शाळेतील मुलांना शिकण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ पेण आणि रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पेण तालुक्यातील रावे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला डिजिटल स्क्रीन भेट देण्यात आली. इनरव्हील क्लब ऑफ पेणच्या अध्यक्षा तन्वी सागर हजारे यांच्या हस्ते डिजिटल स्क्रीनचे उद्‍घाटन करण्यात आले. आधुनिक जगामध्ये डिजिटल शिक्षण मिळावे, या उद्देशाने स्क्रीन दिल्याचे तन्वी हजारे यांनी या वेळी सांगितले. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सरस्वती ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गुरुनाथ पाटील, अनिता पाटील, आशा पाटील, तेजस्विनी पाटील, प्रेमा पाटील, एम. टी. सर, सुषमा पाटील, अनुसया म्हात्रे, सुगंधा म्हात्रे, हेमलता म्हात्रे, दीपक बांदल, हेमांगी मानकवळे; तसेच रोटरी क्लबचे सुबोध जोशी, इनरव्हील क्लब सदस्या मुस्कान झटाम, श्वेता गावंड, वैशाली समेळ आदी उपस्थित होते.