पोलिस पाटलाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पोलिस पाटलाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
वडखळ, ता. ५ (बातमीदार) : ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलिस पाटलाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार वडखळ विभागात घडला आहे. या प्रकरणात फरारी आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पेण तालुक्यातील डोलवी येथील रमेश अंबाजी पाटील याने आपल्या मित्राच्या १४ वर्षीय मुलीवर गेली दोन वर्षे अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकाराने वडखळ परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपी रमेशने पीडितेला तिच्या वडिलांना मारण्याची धमकी देत ऑक्टोबर २०२२ पासून बोरी, कार्ला व लोणावळा या ठिकाणी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार पीडितेच्या आईला समजताच तिने वडखळ पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. या गुन्हाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

