

गडब येथे आज कांळबादेवीची यात्रा
वडखळ, ता. १० (बातमीदार) ः तालुक्यातील प्रसिद्ध जागृत कांळबादेवीची यात्रा दरवर्षीप्रमाणे आज शुक्रवार (ता. ११) रोजी पार पडणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी यात्रेची तयारी केली असून मोठ्या जल्लोषात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे.
यात्रेनिमित्त सकाळी कांळबादेवीची विधिवत पूजा , पालखी मिरवणूक व देवकाठ्या उभारणे आदीची स्पर्धा पार पडणार आहे. यावेळी उंचच उंच देवकाठ्या सर करण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ ढोल ताशांच्या गजरात यात्रेत सहभागी होतात. यावेळी जुनी जाणती ज्येष्ठ मंडळीसोबत युवकवर्गसुद्धा देवकाठ्या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने भाग घेतात. या देवकाठ्या कळकीचे बांबू ऐकमेकावर बांधून उंच अशी बनवली जाते. या देवकाठ्या मोठ मोठ्या वासाच्या सहाय्याने तयार केलेल्या परांचीवर दोराच्या साह्याने उभ्या केल्या जातात. देव काठी उभी करताना ग्रामस्थांचे एकिचे सामर्थ दिसून येते. देवकाठी उभी करणे व उतरणे यासाठी ग्रामस्थांचा कस लागतो. तर परांची वर चढलेल्या ग्रामस्थाला देवकाठी उभारताना व उतरविताना महत्वाची भुमिका बजवावी लागते. तसेच देवकाठी स्थिर ठेवण्यासाठी पागाणी पकडणाऱ्या व्यक्तीवर मोठी जबाबदारी असते. देवकाठी उभी राहिल्यानंतर ग्रामस्थांचा जल्लोष पाहण्यासारखा असतो. या जल्लोषात अगदी वयाच भान न ठेवता अबालवृद्धदेखील सहभागी होतात. दरम्यान यात्रेत पाळणे, खेळण्यांची, मिठाईंच्या दुकानांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. कांळबादेवीचे दर्शन घेण्यासाठी भक्त मुंबई, ठाणे, पुणे आदी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.