पाणीपट्टीवरून महासभेत गोंधळ

पाणीपट्टीवरून महासभेत गोंधळ
Published on

पाणीपट्टीवरून महासभेत गोंधळ
भाजप नगरसेवकांचा प्रवेशद्वारावर ठिय्या
विरार,  ता.१(बातमीदार)ः वाढीव पाणी, घरपट्टी  वाढ, अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात भाजप नगरसेवकांनी सोमवारी पालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. त्यामुळे  प्रशासक काळातील करवाढीवरून रोष वाढला आहे.
वसई-विरार पालिकेने १७ जानेवारी २०२५ पाणीपट्टीत वाढ केल्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर वाढीव देयके नागरिकांना वितरित करण्यात आली. जुलैमध्ये झालेल्या महासभेत यावरून जोरदार गदारोळ झाला होता. त्यावेळी भाजप नगरसेवकांनी सभात्याग केला होता. सोमवारी महासभेपूर्वी भाजप नगरसेवकांनी याच मुद्यावरून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. तसेच वाढीव पाणीपट्टी तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. त्यातच घरपट्टीतही २५ टक्के वाढ करून महापालिकेने जनतेवर मोठा आर्थिक अन्याय केला आहे, असा आरोप त्यांनी केला. अतिरिक्त कराचा बोजा त्वरित हलका करावा, तसेच पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली. तसेच जनतेच्या हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. या आंदोलनात भाजपच्या नगरसेविका प्रज्ञा पाटील, गटनेते अशोक शेळके यांच्यासह नगरसेवक सहभागी झाले.
----------------------------
शहरात अनियमित पाणीपुरवठा होत नाही. अनेक भागात पाण्याच्या तीव्र टंचाई आहे. टँकरवर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. तर दुसरीकडे पाणीपट्टी दुप्पट करून नागरिकांची लूट सुरू आहे.
- मनोज पाटील, नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com