

शिरगाव किल्ला पर्यटनाचे केंद्र
पुरातत्त्व विभागाकडून स्थळ व्यवस्थापन आराखडा
पालघर, ता.४ ः येथील शिरगाव किल्ला संवर्धनासाठी राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभाग स्थळ व्यवस्थापन आराखडा तयार करणार आहे. यासाठी संवर्धन तज्ज्ञ वास्तू शिकल्पकारांच्या नेमणूक केली जाणार आहे.
१७३९ साली डहाणू, केळवे, तारापूरसोबत मराठ्यांनी किल्ला जिंकला होता. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. १७३७ ते १७३९ दरम्यान चिमाजी आप्पा यांनी हा किल्ला मिळवला होता. त्यामुळे एेतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या शिरगाव किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन दुरुस्तीसाठी जवळपास सव्वा सहा कोटींचा निधी खर्च केला होता. मात्र, आता पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांसाठी सर्व सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.
------------------------
इतिहासाला उजाळा
- पर्यटकांना या माध्यमातून इतिहास समजून घेता येणार आहे. पुरातत्व, वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या रत्नागिरी विभागाकडून स्थळ व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची मान्यता मिळाली आहे.
- किल्ल्याच्या इतिहासाची माहिती देणारी विविध दालने, पर्यटकांसाठी पायाभूत, मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, इतर प्रकारच्या सर्व सुविधा उभारणीसाठी नियमावलीचा आराखडा तयार केला जाणार आहे.
------------------
वैशिष्ट्यपूर्ण रचना
शिरगावचा किल्ला साधारण २०० फूट लांब व १५० फूट रुंद आहे. किल्ल्याची तटबंदी ३५ फूट उंच व १० फूट रुंद आहे. किल्ल्याला चार बुरूज असून प्रवेशद्वाराजवळ एक बुरूज आहे. प्रवेशद्वारावर सुबक बांधणीचा चबुतरा आहे. येथील तटबंदीवर जाण्यासाठी तटबंदीच्या बाहेरून तर बुरुजांवर जाण्यासाठी अंतर्भागातून पायऱ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.