

सानुग्रह अनुदानासाठी तगादा
स्थानिक कामगार संघाचे महापौर,आयुक्तांना निवेदन
विरार, ता. १३ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिकेतील स्थायी, अस्थायी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करावे, अशी मागणी स्थानिक कामगार संघाने केली आहे. संघाचे समन्वयक हार्दिक राऊत यांनी महापौर अजीव पाटील आणि आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांच्या मेहनतीमुळे आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये महापालिकेने ४०२ कोटी रुपयांची विक्रमी करवसुली केली, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या महसूलवाढीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्ठेचा व परिश्रमांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे संघाने म्हटले आहे.
गतवर्षी महापालिका प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २२ हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले होते. या निर्णयाबद्दल संघाने प्रशासनाचे आभार मानले आहेत. यंदा महापालिकेची आर्थिक कामगिरी आणि वाढती महागाई लक्षात घेता सानुग्रह अनुदानाच्या रकमेत वाढ करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दिवाळी सणानिमित्त महापालिकेतील सर्व स्थायी, अस्थायी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करावे, अशी मागणी संघाने केली आहे. या मागणीवर महापालिका प्रशासन आणि सभागृह काय निर्णय घेणार, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.