

मुरबे बंदराने उपजीविकेवर टाच
मच्छीमारांचे आक्षेप, नुकसानभरपाईबाबत संभ्रम
सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. २१ ः येथील प्रस्तावित मुरबे बंदराच्या समुद्रातील सर्वेक्षण, खनन, खोदकामांमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणामाची भीती आहे. या प्रकल्पात पर्यावरणीय मंजुरीतील अटींची पूर्तता, सागरी जैवविविधतेचे संरक्षण, नुकसानभरपाईबाबत स्पष्टता नसल्याचा आक्षेप मच्छीमारांनी नोंदवला आहे.
जेएसडब्ल्यू मुरबे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकल्पाला केंद्राच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने १६ जुलै २०२६ मध्ये पर्यावरणीय, सीआरझेड मंजुरी दिली आहे. मंजुरीनंतर समुद्रात सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. पण कामांचे नेमके स्वरूप, परवानग्या, कामाचे वेळापत्रक, परिणामाची अधिकृत माहिती ग्रामस्थांना नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या कामांमुळे सागरी अधिवासावर होणारे परिणाम तसेच मत्स्यसाठे, पारंपरिक मासेमारी क्षेत्र बाधित होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कंपनी व्यवस्थापनाने प्रतिक्रिया देण्याचे अधिकार नसल्याचे कारण दिले आहे. तर मासेमारीचा हंगाम संपेपर्यंत समुद्रातील सर्वेक्षण, ड्रिलिंग, खोदकाम थांबवावे, संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-------------------------
मुरबे जेएसडब्ल्यू बंदर प्रकल्पाच्या विविध कामांमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे. पर्यावरणीय मंजुरीतील अटींची पूर्तता, सागरी जैवविविधतेचे संरक्षण, बाधिताच्या नुकसानभरपाईची स्पष्टता नाही.
- धीरज गावड, उपसरपंच, नांदगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.