

कचरा व्यवस्थापनापुढे महापालिकेची आव्हाने
घनकचरा प्रकल्पाला वारंवार आग
विरार, ता. २८ (बातमीदार) : वसई-विरारमधील कचरा समस्येवर उपाय शोधण्यासाठी लोकप्रतिनिधींनी नुकताच गोव्याचा अभ्यास दौरा केला. मात्र, २०१९ मध्ये इंदूर दौरा करूनही शहरातील कचरा समस्या कायम आहे. त्यातच भोयदापाडा येथील घनकचरा प्रकल्पाला वारंवार आग लागत असून, ओला-सुका कचरा वेगळा करण्यासाठी डब्यांचाही तुटवडा आहे. त्यामुळे गोवा दौऱ्यातून ठोस उपाययोजना पुढे येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील अनेक भागांत रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या भूखंडांवर कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी व अस्वच्छतेचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. सोमवारी सायंकाळी भोयदापाडा घनकचरा प्रकल्पाला पुन्हा आग लागून धुराचे लोट पसरले. वर्षभरात या ठिकाणी जवळपास ४० वेळा आग लागल्याचे समोर आले आहे.
महापालिकेकडून सोसायट्यांना ओला-सुका कचरा वेगळा करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या डब्यांची गेल्या दोन वर्षांत खरेदी झालेली नाही. खरेदीसाठी काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याचे प्रशासनाने सांगितले. महापालिका साधारणतः २० हजार डबे मागवते; मात्र, ही संख्याही अपुरी असल्याचे सांगण्यात येते.गोव्याच्या दौऱ्यातील निरीक्षणे, शिफारशी आणि अंमलबजावणीचे नियोजन लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे. अभ्यास दौरा केवळ पाहणीपुरता मर्यादित न राहता कचरा संकलन, वर्गीकरण आणि विल्हेवाटीसाठी ठोस उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.