

वसई-विरार महापालिकेचा
प्रभाग रचना ठराव अखेर निलंबित
ठराव जनहित आणि प्रशासकीयदृष्ट्या अयोग्यचा ठपका
विरार, ता. २८ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आलेला प्रभाग रचनेचा वादग्रस्त ठराव महाराष्ट्र शासनाने अखेर निलंबित केला आहे. महापालिकेच्या आर्थिक, प्रशासकीय तसेच व्यापक लोकहिताच्या विरोधात हा ठराव असल्याचा ठपका ठेवत नगरविकास विभागाने ही कारवाई केली आहे.
वसई-विरार महापालिकेने २० मार्चला झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रभाग रचना बदलण्याबाबतचा ठराव मंजूर केला होता. या ठरावानुसार नव्याने तयार करण्यात आलेल्या ९ प्रभाग समितींपैकी ७ प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये बदल करण्यात आला होता. वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तांनी १ ऑक्टोबरला शासनाला पत्र पाठवून हा ठराव जनहित आणि प्रशासकीयदृष्ट्या अयोग्य असल्याचे स्पष्ट केले होते.
----
राजकीय दबाव पोटी शासनाने घेतलेला निर्णय असा या निर्णयाचा अर्थ निघतो आहे. 20 मार्चला घेतलेल्या ठरावावर निर्णय घेण्यास शासनाला जवळपास 8 महिने लागले यातच राजकारण दडले आहे. आम्ही आता एकत्र बसून पुढे काय करायचे यावर निर्णय घेऊ. शेवटी हा निर्णय महासभेत होणार आहे.
- निलेश देशमुख,आरोग्य समिती सभापती
--------
या निलंबन प्रकरणी संबंधितांना ३० दिवसांच्या आत शासनाकडे आपले निवेदन सादर करण्याची मुदत आहे. परंतु, या निमित्ताने विरोधक म्हणून भारतीय जनता पक्षाने जनहिताच्या मुद्द्यावर घेतलेली आक्रमक भूमिका अत्यंत यशस्वी ठरली असून, बविआच्या मनमानीला लगाम लागल्याने शहरात भाजपच्या रणनीतीचे जोरदार स्वागत होत आहे. - अशोक शेळके,गटनेता , भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.