पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा धक्का

पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा धक्का
Published on: 

पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा धक्का
तलासरीत २.८ रिश्टर स्केलची नोंद
पालघर, ता. ७ ः जिल्ह्यात भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू असून, शनिवारी तलासरी तालुक्यात संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान २.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कुरझे परिसरात असल्याची नोंद झाली आहे. केंद्रबिंदूपासून सुमारे पाच किलोमीटरच्या परिघात भूकंपाची नोंद झाल्याने परिसरातील भूकंपाच्या हालचाली पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
विशेष म्हणजे याच परिसरात ३१ ऑक्टोबरला एकाच दिवशी दोन भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या वेळी अनुक्रमे ३.२ आणि २.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा २.८ रिश्टर स्केलचा धक्का बसल्याने तलासरी आणि परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी आणि विक्रमगड परिसरात यापूर्वीही सातत्याने भूकंपाचे सौम्य धक्के नोंदवले गेले आहेत. त्यामुळे या भागातील भूकंपप्रवण क्षेत्राचा अभ्यास, भूकंपाच्या नोंदींचे विश्लेषण आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. दरम्यान, या धक्क्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.