esakal | कांदिवलीत शिवसैनिकांकडून डिलिव्हरी बॉयला मारहाण, चौघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

कांदिवलीत शिवसैनिकांकडून डिलिव्हरी बॉयला मारहाण, चौघांना अटक

कांदिवलीत शिवसैनिकांकडून डिलिव्हरी बॉयला मारहाण, चौघांना अटक

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: डिलिव्हरी बॉयला मारहाण (delivery boy assault) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शिवसेना शाखाप्रमुखासह (shivsena shakhapramukh) चौघांना गुरुवारी अटक केली. कांदिवलीच्या (kandivali) पोईसर भागात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितानुसार, एकूण सहा आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून दोघेजण फरार आहेत. कांदिवली पूर्वेला पोईसरमध्ये जयहिंद चाळीत राहणाऱ्या राहुल शर्माने (rahul sharma) समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. (Four Shiv Sena workers including the branch chief arrested for assaulting a delivery boy dmp82)

ई-कॉमर्स साईटसाठी आपण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याचे त्याने सांगितले. मंगळवारी दुपारी पार्सलची डिलिव्हरी करण्यासाठी म्हणून राहुल पोईसर येथे गेला होता. त्यावेळी जोरदार पाऊस सुरु झाला म्हणून त्याने शिवाजी मैदानाजवळ असलेल्या शिवसेना शाखेच्या शेडमध्ये आसरा घेतला, असे पोलिसांनी सांगितले. राहुल शर्मा पार्सल घेऊन उभा असताना तिथून जाणारे शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत निनावे यांनी समानावर पाय ठेवल्याने वाद झाला.

हेही वाचा: Olympics: तिरंदाज दीपिकाकुमारीची जबरदस्त कामगिरी, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

"राहुलने चंद्रकांत निनावे यांना, सामान आहे, जरा सांभाळून असे सांगितले. त्यावरुन वादावादीला सुरुवात झाली. शाब्दीक बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत झाले. चंद्रकांत निनावे आणि अन्य पाच शिवसैनिकांनी मिळून राहुल शर्माला मारहाण केली" अशी माहिती पोलिसांनी दिली. आयपीसीच्या विविध कलमातंर्गत सहा शिवसैनिकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. "चार जणांना अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत. पुढील तपास सुरु आहे" असे पोलिसांनी सांगितले.

loading image
go to top