मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; CSMT ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी विशेष सेवा चालविणार

प्रशांत कांबळे
Saturday, 10 October 2020

मध्य आणि पश्‍चिम रेल्वे रविवारी (ता. 11) उपनगरी भागांवर मेगाब्लॉक घेणार आहे. माटुंगा-मुलुंड अप-डाऊन मार्गावर, कुर्ला-वाशी अप-डाऊन आणि बोरिवली-भाईंदर या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : मध्य आणि पश्‍चिम रेल्वे रविवारी (ता. 11) उपनगरी भागांवर मेगाब्लॉक घेणार आहे. माटुंगा-मुलुंड अप-डाऊन मार्गावर, कुर्ला-वाशी अप-डाऊन आणि बोरिवली-भाईंदर या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला स्थानक आणि वाशी-पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालविण्यात येणार आहे. 

कुठे- बोरिवली ते भाईंदर मार्गावर 
कधी- सकाळी 10.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 
परिणाम- ब्लॉकदरम्यान अप धीम्या मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्या विरार-वसई रोड मार्गावरून बोरिवली, गोरेगाव या अप जलद मार्गावर सोडण्यात येतील. डाऊन धीम्या मार्गावरील सर्व गाड्या गोरेगाव-वसई, विरार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील. 

कुठे- माटुंगा-मुलुंड अप व डाऊन मार्गावर 
कधी- सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 
परिणाम- सकाळी 9.30 ते दुपारी 2.40 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील विशेष सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. सकाळी 10.1 ते दुपारी 2.53 दरम्यान ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील विशेष सेवा मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. संबंधित निर्धारित थांब्यांवर थांबविण्यात येतील. पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. 

कुठे- कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर 
कधी- सकाळी 10.5 ते दुपारी 3.5 दरम्यान 
परिणाम- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 2.30 या वेळेत वाशी, पनवेलसाठी डाऊन हार्बर मार्गावरील विशेष सेवा बंद राहतील. पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील विशेष सेवा सकाळी 9.35 ते दुपारी 2.15 या वेळेत विशेष सेवा बंद राहतील. 

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tomorrow megablocks on Central West Harbor routes