esakal | खालापूरमध्ये मुंबईचा पर्यटक बुडाला 
sakal

बोलून बातमी शोधा

खालापूरमध्ये मुंबईचा पर्यटक बुडाला 

खालापूर येथील बंधाऱ्यात मुंबईच्या एका तरूणाता बुडून मृत्यू झाला आहे.

खालापूरमध्ये मुंबईचा पर्यटक बुडाला 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खालापूर : सांताक्रूझ येथून मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी आलेला जुएल डिसोजा (34) याचा नढाळ बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 1) घडली. जुएल हे बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरले होते.

त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडले. सोबत असलेल्या मित्रांनी त्यांचा शोध घेतला; परंतु जुएल सापडले नाहीत. अखेर स्थानिकांच्या मदतीने त्यांनी या घटनेबाबतची माहिती पोलिसांना कळवली.

पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्यासह पोलिस नाईक प्रसाद पाटील, अजय मोहिते हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने जुएल यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. 

loading image
go to top