सर्वात मोठी बातमी - मुंबईतील चेंबूर परिसरातील केमिकल कंपनीतून विषारी वायू गळती

सर्वात मोठी बातमी - मुंबईतील चेंबूर परिसरातील केमिकल कंपनीतून विषारी वायू गळती

मुंबई - मुंबईतील चेंबूर येथील माहुल गाव परिसरातील एजिस सीलॉर्ड कंटेनर्स या केमिकल कंपनीमधुन काल रात्री पासून अति उग्र विषारी वायु गळती होत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चेंबूर परिसरातील माहुल व  अंबापाडा गावाच्या शेजारीच बीपीसीएल, एचपीसीएल, टाटा पॉवर, एजिस (सीलॉर्ड) कंटेनर्स केमिकल या कंपन्या आहेत. त्यामुळे चेंबूर परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने परिसरात कर्करोग, गर्भपात, श्वसन रोग, क्षयरोग,  हृदयविकार, लकवा सारख्या रोगांनी थैमान घातले असताना एजीस सीलॉर्ड कंटेनर्स केमिकल कंपनीतून काल रात्री ठीक. 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात विषारी वायूचा गळती झाल्याने परिसरात उग्र वास सुटला. त्यामुळे गेले दोन दिवस नागरिकांना घरात रहाणे मुश्किल झालंय. तसंच गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गेल्या दोन महिन्यापासून अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ही कंपनी 300 पेक्षा अधिक विषारी वायूचे टँकर रोज भरते. त्यामुळे सतत विषारी वायू गळती होत असल्याने गावकऱ्यांना श्वास घेणे कठीण झाले आहे. तसेच या टँकरमध्ये वायू भरणाऱ्या अनेक कामगाराना कोरोना लागण झालेली आहे. त्यामुळे  आंबापाडा मधील गावकऱ्यांना संसर्ग होत आहे असं  सांगतात. 

या कंपनी विरोधात गावकरी सतत आंदोलनं देखील करत असतात. दरम्यान सरकारने आता या कंपनीला नोटीस दिली आहे. मात्र ही कंपनी सरकारच्या आणि न्यायालयाच्या नोटीसाला धुडकावत असल्याचं चित्र आहे. कारण सरकार आमच्या खिशात आहे आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही असं गावकऱ्यांना कंपनीचे प्रशासन सांगत आहे. दरम्यान या कंपनीवर सरकारने योग्य ती कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

या कंपनीच्या विरोधात आम्ही 2011 पासून आंदोलन करीत आहोत. गावकऱ्यांनी हरित लवादाकडे तक्रार ही केली आहे. त्यांनी कंपनीला नोटीस दिली आहे. तसेच गावकरी सुप्रीम कोर्टात गेले असता सुप्रीम कोर्टाने या कंपनीला भरसाठ दंड लावला आहे. मात्र तरीही कंपनी मनमानी करीत आहे असं इथले स्थानिक शिवसेना नेते संजय राठोड सांगतात. 

toxic chemical leakage at chembur citizens of nearby areas are facing massive health problems

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com