मुंबईमधून होणार चीनवर मोठा ट्रेड सर्जिकल स्ट्राईक; आयात १ लाख कोटींनी कमी करण्याचा निर्णय

सुमित बागुल
Wednesday, 6 January 2021

गेल्या काळात नवरात्री आणि दिवाळीदरम्यान अखिल भारतीय व्यापारी महासंघाने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला होता.

मुंबई : अखिल भारतीय व्यापारी महासंघाची (कॅट) नुक्तीच मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबई महानगर प्रदेशाच्या नवीन वर्षाचा बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत चीनमधून येणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घालण्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. येत्या वर्षात म्हणजेच २०२१ मध्ये चीनमधून येणाऱ्या वस्तूंची आयात एक लाख कोटी रुपयांनी कमी करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. चीनसाठी हा मोठा धक्का असणार आहे. 

आतली खबर : राजकारण्यांना ED ची चौकशी म्हटली की धडकी का भरते ?

"मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत ग्राहकांची संख्या देशभरच्या तुलनेत सर्वाधिक असते. अशात मुंबईतील व्यापाऱ्यांनी येत्या काळात मिळून एकत्रितरित्या चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कॅटच्या बैठकीत याबाबत चर्चा करून सर्वच व्यापाऱ्यांशी बातचीत करून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे", अखिल भारतीय व्यापारी महासंघ मुंबई महानगर अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी याबाबत माहिती दिली आहे. एकदम सर्व मालावर बहिष्कार टाकल्यास मुंबईकरांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो, म्हणून पुढील वर्षभरात याबाबतची ठोस रणनीती देखील आखली जाणार आहे. 

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

गेल्या काळात नवरात्री आणि दिवाळीदरम्यान अखिल भारतीय व्यापारी महासंघाने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी देशभरातून चीनमधून येणाऱ्या आयातीत चाळीस हजारांची कपात झाली होती. यामध्ये मुंबईचा वाटा तब्बल साडेपाच हजार कोटी रुपयांचा होता. आता कॅटने यंदाच्या वर्षभरात एक लाख कोटी रुपयांची चिनी मालाची आयात कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील मुंबईतील किमान २५ हजार कोटी रुपयांच्या चिनी वस्तूंची विक्री बंद करण्याचा व्यापाऱ्यांचा प्रयत्न आहे.

trade surgical strike on china cat decides to reduce imports worth one lac crore on china products

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trade surgical strike on china cat decides to reduce imports worth one lac crore on china products