Palm oil : पाम तेलाबद्दल जागृतीसाठी देशातील व्यापारी एकवटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traders came together to raise awareness about palm oil mumbai

Palm oil : पाम तेलाबद्दल जागृतीसाठी देशातील व्यापारी एकवटले

मुंबई : पाम तेलाबद्दलचे गैरसमज दूर करून आणखी मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी दक्षिण आशियातील पाच देशांनी मिळून एशियन पाम ऑईल अलायन्सची स्थापना केली. भारतातील तेल उत्पादक आणि व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांची अलायन्सच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कृषी क्षेत्राशी संबंधित संघटना सॉलिडॅरिडॅड नेटवर्कच्या पुढाकाराने अलायन्सची स्थापना करण्यात आली. आता या संघटनेच्या स्थापनेमुळे भेदभाव होणार नाही व आशियाई पाम तेल उद्योगांनाही आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळेल, असा विश्वास एस. ई. ए.चे कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी व्यक्त केला.

पाम तेलाचा वापर करणाऱ्या व आयात करणाऱ्या देशांचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी ही संघटना काम करेल. अन्नपदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या तेलांना बाजारपेठेत समान न्याय मिळावा, यासाठीही संघटना प्रयत्न करेल. पाम तेलाचा खप वाढावा, यासाठी प्रयत्न होईल.

- अतुल चतुर्वेदी, अध्यक्ष, आशियाई पाम ऑईल संघटना