
डोंबिवली : डोंबिवली घरडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. शिवजयंतीचे औचित्य साधत सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण केले जाणार आहे. घरडा सर्कल हे शहराचे प्रवेशद्वार असून या ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळी वाहन कोंडीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून घरडा सर्कल येथील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. रविवारी रात्री १० ते सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत या मार्गावर हा बदल वाहतुक विभागाने लागू केला आहे.