मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर 'ट्रॅफिक जॅम', वीकेंडला पर्यटकांची गर्दी

नाताळ व नववर्षानिमीत्त सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले
Mumbai-Pune Expressway
Mumbai-Pune Expresswaysakal

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी (ता.२५) बोरघाटात वाहनांच्या लांब रांगा लागल्यामुळे घाटातील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. नाताळ व नववर्षानिमीत्त सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. द्रुतगती मार्गावर वाहनांची वाढलेली संख्या व त्यात बोराघाटात सुरु असलेली रस्त्यांची कामे यामुळे वाहनचालकांना शुक्रवार रात्रीपासूनच वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. (Mumbai-Pune Expressway)

Mumbai-Pune Expressway
भारताचे MiG 21 कोसळले; विंग कमांडरचा मृत्यू

नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने लोणावळा, खंडाळा परिसरात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून पर्यटकांच्या वर्दळीने पर्यटननगरी फुलून गेली आहे. यादरम्यान पर्यटकांची संख्या वाढल्याने घाटात पुणे लेनवर बोरघाट पोलीस चौकी, दस्तुरी, अमृतांजन पुल ते खंडाळा बोगदा दरम्यान तर मुंबई बाजूकडे खंडाळा एक्झिट ते नवीन अमृतांजन पुलादरम्यान वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर लांब रांगा लागल्या.वाहतूक संथ गतीने सुरु त्यामुळे दोन्ही बाजूकडे वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. बोरघाट, खंडाळा महामार्ग पोलिसांच्या वतीने वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी प्रय़त्न करण्यात येत आहे. वाहतुक सुरळीत करताना बोरघाट (दस्तुरी), खंडाळा टॅपच्या वाहतुक पोलिसांना नाकी-नऊ आले.(tourists visit Lonavala, Khandala area for Christmas and New Year)

Mumbai-Pune Expressway
पुणे : सिंहगडावर रस्ता चुकलेल्या पर्यटकांना स्थानिकांनी शोधले

१ जानेवारीपर्यंत द्रुतगतीवर अवजड वाहनांना बंदी

नाताळ आणि नविन वर्षांच्या निमीत्ताने सुट्ट्यांमुळे पुणे जिल्ह्यातील तसेच पुणे बाहेरील पर्यटनस्थळी जाण्यासाठी पर्यटनस्थळी जाण्यासाठी नारिकांचे प्रमाण वाढत आहे. यावेळी महामार्गावर अवजड वाहनांची वाहतुक होत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता निर्माण होणार आहे. ही कोंडी टाळण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गासह पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहने, मालवाहू ट्रक्सची वाहतुक १ जानेवारीपर्यंत सकाळी ७ ते १० व सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान थांबविण्यात येणार असल्याची माहीती महामार्ग सुरक्षा पथकाचे उपअधिक्षक प्रीतम यावलकर यांनी दिली. (Deputy Superintendent of Highway Safety Squad Pritam Yavalkar)

Mumbai-Pune Expressway
कोल्हापूर : ‘ॲट्रॉसिटी’तील पीडितांना तत्काळ पेन्शन

द्रुतगती मार्गावरील वाहतुक मंगळवारी (ता.२८) दोन तासांसाठी बंद

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ ओव्हर हेड गॅंट्रीज बसविण्याच्या कामामुळे मंगळवारी (ता. २८) द्रुतगती मार्गावरील वाहतुक दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ या कालावधीत राज्य रस्ते विकास महामंडळाकडून लोणावळ्याजवळ (किलोमीटर क्र. ५५) मुंबई लेनवर ओव्हरहेड गॅंट्रीज बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यादरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतुक दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान द्रुतगतीवरील द्रुतगती मार्गावरील अवजड वाहने किलोमिटर क्र. ५६ येथे थांबविण्यात येणार असून वाहतुक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. वाहतुक विस्कळीत होणार असल्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा व सहकार्य़ करावे असे आवाहन महामार्गचे पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.(Pune-Mumbai expressway closed for two hours on Tuesday due to installation of overhead gantries)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com