अवजड वाहनांमुळे खोपोली-पेण रस्त्यावर वाहतूक कोंडी

अनिल पाटील
Tuesday, 20 October 2020

खोपोली पेण राज्य महामार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू आहे; मात्र रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना गाडी चालवताना त्रास होत आहे; तर या रस्त्याला लागून असलेल्या स्टील कारखान्यामधून दररोज जा-ये करीत असलेली अवजड वाहनांची संख्या वाढले आहे. हे अवजड वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे सातत्याने येथे वाहतूक कोंडी होत आहे.

खोपोल ः खोपोली पेण राज्य महामार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू आहे; मात्र रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना गाडी चालवताना त्रास होत आहे; तर या रस्त्याला लागून असलेल्या स्टील कारखान्यामधून दररोज जा-ये करीत असलेली अवजड वाहनांची संख्या वाढले आहे. हे अवजड वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे सातत्याने येथे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे प्रवासासाठी मार्ग असुरक्षित बनला असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम जे. एम. म्हात्रे कन्ट्रक्‍शन कंपनी करते आहे. 

सरकारी यंत्रणा असताना पालकमंत्री कक्षाची गरज काय? दरेकर आणि तटकरेंमध्ये खडाजंगी

कारखानदारीतून ये- जा करणारी अवजड वाहनांची संख्या या मार्गावर प्रचंड वाढली आहे; मात्र या अवजड वाहनांमुळे रस्त्यांवर खड्डे पडत आहेत. तसेच या वाहनांचे चालक नियमांचे पालन करत नसल्यामुळे येथे अपघात होण्याचा धोका आहे. या रस्त्यावर वाहतूक कोंडीही नित्याची झाली आहे . दरम्यान रस्ता रुंदीकरण झाल्यावर तरी या सर्व अडचणीतून सुटकरा होईल अशी आशा स्थानिक नागरिक, प्रवाशी करत आहेत. 

मास्क किंमती नियंत्रण प्रस्ताव धूळखात, राज्य सरकारला अहवाल सादर

 

 
खड्डे व अवजड वाहनांची वाढलेली संख्या नियमित प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. अवजड वाहनांचे चालक मनमानी करून वाटेल त्या ठिकाणी वाहने उभी करीत आहेत, अशा वाहनांवर संबंधित यंत्रणेकडून कारवाई होताना दिसत नाही. 
- मिलिंद चव्हाण, स्थानिक रहिवासी 

 

खोपोली-पेण मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. खालापूर तालुक्‍यातील जागा अधिग्रहण झाले असून दोन टप्प्यांत हे काम होणार आहे. पहिल्या टप्प्यात काम सुरू असून वावोशी ते खोपोली या अंतरात रस्त्यालगतची झाडे काढून माती भराव सुरू आहे. येणाऱ्या चार महिन्यांत हे काम पूर्णत्वास येईल असे नियोजन आहे. 
   - सचिन म्हात्रे, अभियंता, जे. एम. म्हात्रे कन्ट्रक्‍शन कंपनी 

 

Traffic jam on Khopoli Pen Road

( संपादन ः रोशन मोरे)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic jam on Khopoli Pen Road