कशेडी घाटात वाहनांची वाहतूक कोंडी; गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची कोकणाकडे धाव...

देवेंद्र दरेकर
रविवार, 2 ऑगस्ट 2020

  • कशेडी घाटात चाकरमान्यांच्या वाहनांची वाहतूक कोंडी ;
  • कशेडी चेक पोस्ट वर वाहतूक कोंडी 
  • 2 ते 3 की मी च्या रांगा ;
  • चाकरमानी गावागावात मार्गस्त 

पोलादपूर -  यंदाचा गणेशोत्सव 22 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून कोकणात येण्यासाठी चाकरमान्यांनी आतापासूनच धाव घेतल्याचे दिसून येत आहे. आज मुंबईहून कोकणात येण्यासाठी मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चाकरमान्यांच्या गाड्यांची रांग लागलेली असून यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

 मुंबईकरांची यशाच्या दिशेनं वाटचाल, धारावीत उरले केवळ इतकेच अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई गोवा महामार्गावर गणेशोत्सव हजारो चाकरमानी गावागावात दाखल होत असतात या वर्षी चाकरमानी याना गावात येताना 14 दिवस क्वांरटाईन व्हावे लागणार आहे. या साठी अनेक चाकरमानी 7 ऑगस्ट पर्यत दाखल होणे गरजेचे असल्याने अनेक चाकरमानी गावागावात दाखल होत आहे नारळी पौर्णिमा रक्षा बंधन 3 रोजी असल्याने अनेक चाकरमानी यांनी गावाकडे घाव घेतली आहे आज सुमारे  दोन ते तीन किलोमीटर इतकी रांग लागल्याचे पहावयास मिळते.

 मुंबईत पुन्हा धोका वाढतोय? सलग दोन दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा चिंताजनक

या रांगेतच अवजड वाहने असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. चाकरमानी ७ तारखेपर्यंत कोकणात आले तरच २२ तारखेला क्वारंटाईन होऊन बाहेर पडू शकतात, या गणितामुळे आतापासूनच चाकरमान्यांनी कोकणाकडे धाव घेतली आहे. या काळात वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी देखील होत आहे.शासनाने अध्याप चाकरमानी याच्या साठी एसटी कोकण रेल्वे याची सोय केली नसल्याने व भविष्यात केल्यास 50 टक्के आसन नियमावली केल्यास गर्दी होण्याची शक्यता आहे शासनाच्या 14 दिवसाच्या नियमावली चा फटका सर्व सामान्य नागरिकांना नोकरवर्गाला बसला आहे 

कोरोनाच्या संकटकाळात मुंबई पालिकेवरील भार वाढला, तब्बल इतके कोटी खर्च

आज इतर राज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर मुंबईत पुणे सह इतर शहरात दाखल होत आहे त्यांना 14 दिवस क्वांरटाईन ची नियमावली नसल्याने कोकणातील चाकरमानी यांना ही सक्ती का असा सवाल प्रवासी विचारात आहे  

 

मला कोणतेही कोरोना लक्षणे नसताना, केवळ शासनाकडे वैद्यकिय यंत्रणा आणि उपाययोजना नसल्याने मी एका खोलीत स्वतःला  14 दिवस कोंडून घेवून का?  प्रशासनाकडे तपासणीची योग्य यंत्रणा नसल्याने मी विनाकारण का त्रास सहन करायचा? 

- विपूल परब, प्रवासी

-----------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic jams in Kashedi Ghat; Servants run to Konkan for Ganeshotsav ...