
मुंबई : मोबाईल ग्राहकांना इंटरनेट डेटा न घेता देखील फक्त दूरध्वनी आणि एसएमएससाठी रिचार्ज प्लॅन देण्याचे आदेश टेलिकॉम रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) मोबाईल कंपन्यांना दिले आहेत. टेलिकॉम कन्झ्युमर प्रोटेक्शन रेग्युलेशन (बारावी दुरुस्ती) नुसार ‘ट्राय’ने हे बदल जाहीर केले आहेत.