esakal | रेल्वे प्रवाशांना मिळणार जलद वायफाय सेवा
sakal

बोलून बातमी शोधा

 रेल्वे प्रवाशांना मिळणार जलद वायफाय सेवा

प्रवाशांना एका स्थानकात 30 मिनिटे जलद वायफाय सेवा वापरता येईल. 

रेल्वे प्रवाशांना मिळणार जलद वायफाय सेवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पश्‍चिम रेल्वेवरील एकूण 300 स्थानकांत मोफत वायफाय सुविधा देण्यात आली आहे. या वर्षात मध्य रेल्वेवरील 153 स्थानकांत मोफत वायफाय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. प्रवाशांना एका स्थानकात 30 मिनिटे जलद वायफाय सेवा वापरता येईल. 
मुंबई सेंट्रल स्थानकात मोफत इंटरनेट सुविधा सुरू झाल्यानंतर पश्‍चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावरील अनेक स्थानकांत मोफत वायफाय सुविधा देण्यात झाली. अशी सुविधा सुरू झालेले हार्बर मार्गावरील रे रोड हे 1000 वे स्थानक आहे. मध्य रेल्वेवर 2019 मध्ये 153 स्थानकांत वायफाय यंत्रणा बसवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पुढील 100 दिवसांच्या कृती आराखड्यात 6485 स्थानकांत वायफाय सुविधा देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. 
 

loading image
go to top